Thursday, April 17, 2008

सवय

आता स्वत:मध्ये चांगल्या सवयी वाढवायच्या ठरवल्या होत्या. गुढीपाडव्यापासून आरंभही केला होता. पण तो निश्चय जेमतेम एक आठवडाच टिकला आणि मग येरे माझ्या मागल्याची परिस्थिती निर्माण झाली. खर तर एवढी चांगली नोकरी आहे. सर्व प्रकारच्या सुविधा आहेत पण तरीही मन काही रमत नाही. का अस होत असेल माझ्यासोबत. नव-याने सांगितल्याप्रमाणे एखादी गोष्ट का होते हे शोधायचे असेल तर त्या गोष्टीच्या शेवटापर्यंत जायला पाहीजे. आता तुम्ही म्हणाल ’बरोबर तर आहे’ मलाही पटतय. मग मी जाते का अशी शेवटपर्यंत ? नाही.... कारण ?? कंटाळा नावाच एक जबरदस्त भूत माझ्या मानगुटीवर बसलय. त्याला कस उतरवाव हे कोडच मला सुटत नाही.

कधी कधी मात्र कामाचा जाम उत्साह येतो. वाटत काय करु आणि काय नको. सगळी काम कशी उत्साहात आणि एकदम वेळेत पूर्ण होतात. आणखी आणखी गोष्टी कराव्याश्या वाटतात. नविन काहीतरी शिकावस वाटत. सगळ कस एकदम पॉझिटीव्ह वाटायला लागत. मनात वाटत आता आपली गाडी रुळावर लागली. पण कसच काय आणि फाटक्यात पाय. चार दिवसांची धुंदी लगेच उतरायला लागते आणी मग पहिले पाढे पंचावन्न. तोच निरुत्साह आणी तोच कंटाळा. मी काय करु ? ही परिस्थीती बदलायची आहे. या सगळ्यातून बाहेर पडायचय. मला स्वत:ला एक वेगळी व्यक्ती म्हणून जगायचय. स्वत:च अस्तित्व निर्माण करायचय.

मग लक्शात आल कि आपल मनही मोकळ व्हायला पाहीजे ते होत नाही आणि एक प्रकारच मळभ आपल्या मनावर येत. ते येउ नये म्हणून हा प्रयत्न आहे.

जेव्हा लोक आपल्यापेक्शा पुढे जाताना दिसतात तेव्हा खूप वाटत कि आपणही पुढे जायला पाहीजे. हेही लक्शात येत कि लोक मेहनत करतात आणि पुढे जातात. त्यांच्यासाठीही यश काही आकाशातून टपकत नाही. पण हा मेहनतीचा भाग आला कि माझ्या मानगुटीवरच भूत परत माझ्या विचारांवर आपला कब्जा जमवायला लागत आणि मग परत तेच ते सुरू होत, तोच कंटाळा....

आता मात्र बदलायचय...बदलणारच